Subscribe:

Ads 468x60px

31 December 2011

नविन वर्ष येते आहे ..

नविन वर्ष येते आहे .. आणि आता आज मनात मंथन सुरु झाले आहे ... वर्षाचा शेवटचा दिवस हां नेहमी असाच असतो ... भूतकाळाच्या लाटा सर्व प्रसंग घेउन आत आपटत आहेत ... काहीतरी त्रेधा तिरपीट चालू असते मनामधे ... त्यातून मागील वर्षातील ग्लानिर्भाव आणि सुखाचे क्षण यांना डोक्यात कुठेतरी बाजूला डाम्बुन त्यातून नविन आयुष्य रेघ कशी आखावी हेच काहीतरी धोरण धरले आहे ... त्यात २०१२ हे धर्म,ज्योतिष्य आणि विज्ञानं ह्या त्रिकुटाने वेध साधलेले वर्ष म्हणजे काळजामधे थोडा जास्तच अंतर्नाद होत आहे ... मागील वर्षाने सर्व भावनिक अनुभव दिले आणि त्यानुसार नविन वर्ष हे जरा जास्तच कुतूहल निर्माण करत आहे ... यावर्षी मनावर आणि कर्मावर जमलेली विचारांची काजविच २०१२ ची कथा लिहिवो हां ध्यास घेउन नविन वर्षाचे स्वागत करायचा निर्धार राखला आहे ...तुम्ही पण अल्पायुषी पेज मधून मैत्री साधली त्याचा विशेष आनंद आहेच ... २०१२ मी तयार आहे ...

मराठी आहे मराठीच राहणार, नविन वर्षाच्या शुभेच्छा गुडीपाडव्यालाच देणार.

गेल्या काही दिवसां पासून फेसबुक वर पाहतो आहे कि ,

"मराठी आहे मराठीच राहणार, नविन
वर्षाच्या शुभेच्छा गुडीपाडव्यालाच देणार.
॥जय हिंद॥जय महाराष्ट्॥"

पाहून आनंद वाटला कि चला मराठी माणुस खर्या अर्थाने जागा झाला पण मग हे प्रश्न पण मनात आले , तसा मला कोणाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही पण
१. अश्या घोषणा देणारे लोक त्यांच्या नेत्यांचे,स्वतः चे वाढ़दिवस का बर शालिवाहन दर्शिकेनुसार साजरे नाही करत ?
२. आपले 'बाल गन्धर्व' आणि 'हरीशचंद्राची फैक्ट्री' सारखे उत्कृष्ट चित्रपटान्ना महाराष्ट्राच्या मातीत पण प्रेक्षक का नाही भेटत ?
३. किती जण आपला वाढदिवस तिथि नुसार साजरा करता अथवा त्यांना माहिती आहे ... माझा वाढदिवस माझ्या घरचे तिथिनेच साजरा करता म्हणून ती किती मोठी कसरत आहे हे मला ठावुक आहे . चला किती जन्नाना हे कुठले शालिवाहन शके चालू आहे ह्याची कल्पना आहे ? खर सांगतो मी पण काही दिवसापूर्वी विसरलो होतो म्हणून 'कालनिर्णय' पाहिले होते .
४. महाभारत मधे १० पांडव पुत्र, कौरवांचे सावत्र भाऊ, कर्णाचा लहान भाऊ आणि इतर शेकडो पात्र निदान पांडवांचे नाव पण किती नव युवकांना विशेषता: युवातिन्ना माहित आहे ?
५. आम्ही मराठी लोक आता आपल्या पाल्याला का इंग्लिश माध्यमा मधेच टाकतो .

30 December 2011

मार्लेश्वर धबधबा...

मार्लेश्वर धबधबा...


रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.

गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.

24 December 2011

'ही आहे भारताची खरी सुन आणि तो आहे भारताचा खरा राजपुत्र'

'ही आहे भारताची खरी सुन आणि तो आहे भारताचा खरा राजपुत्र'

आणि असे ८० करोड़ गरीब जे ह्या मातीचे आहे जे ह्या माती साठी आहे ..
त्यांना भगवे,हिरवे,निळे,पांढरे असे जरी तोलले जात असले तरी त्यांना तितकाच हक्क आहे जितका कोणा सुवर्ण शिलेवर तोलल्या जाणार्या पांढरपेशी नशीबवान अनुजास असेल ...
जर कोणी करोड़ोंमधे उठून दिसत असेल तर करोड़ोंचे जीवन पणाला लावून त्याचे जीवन घडवले नाही जात ...
निसर्गात भेद नाही ... निसर्गात भेदाचा भाव पण नाही ...
कुठली भावना जपायची , मोठी करायची आणि इतिहासात नोंदवायची .. हे समाजच ठरवतो पण माया जपणार्या काळ पुरुषापेक्षा तत्वे उभी करणारा युगपुरुषच मोठा असतो ...

ike आणि comment चे भुकेले , हे फेसबुक admin

●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋• ●๋•

like आणि comment चे भुकेले , हे फेसबुक admin सारे
आपले पेज म्हणजे जणू काही मंदिर समजुन पूजणारे
माहिती टाकण्यासाठी दिवस रात्र धजणारे
विनोद,कथा आणि प्रसंग ह्यांची कास धरणारे
काही असता प्रमाणिक काही मिळेल ते चोरणारे
तारी वरची कसरत करत फेसबुक जगणारे
प्रेम आणि द्वेष झेलत नेहमी गोड हसणारे
अचानक मध्य रात्री झोपेतून उठ्नारे
आणि फेसबुक मधे शिरून मित्र सख्य जपणारे
पेज च्या like ला संपत्ति सारखे मोजणारे
'ऐ माझे पेज शेयर कर ना! ' अशी वल्गना करणारे
जीवनाच्या प्रवास झेलुन रोज अपडेट टाकणारे
खेळ चालू ठेवता सदैव्य कितीही असो टोकणारे
तरी देखिल like आणि comment चे भुकेले , हे फेसबुक admin सारे

माझ्या सर्व फेसबुक Admin मित्रांन्ना आणि माझे परम मित्र 'फेसबुक कीड़ा' आणि 'जेठालाल गडा' ह्यांना समर्पित ..

सर्व हक्क - असाच एकजण

23 December 2011

मुका जीव ... ४ लोकां सारखा माझ्याशी बोलू नाही शकत ...

मुका जीव ... ४ लोकां सारखा माझ्याशी बोलू नाही शकत ...
पण माझ्या भावना हाच बरोबर जाणतो ... आणि माझ्याशी सवांद हाच पाहिजे तसा साधतो ....
पुरात घर वाहून गेले ... स्वप्न वाहून गेले पण नाकातोंडात पाणी जरी गेले तरी हां जिवाचा सखा असा नाही जावू द्यायचा हाच ध्यास ....
हेच असते आयुष्य ... सारे द्रव्य जमवण्यात जाते आणि शेवट भावना आणि नाती जपण्यातच पणाला लागते ...
 

पांडुरंग सदाशिव साने

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

-------------------------------------------------------------------------------
पांडुरंग सदाशिव साने
परमपूज्य गुरुजींना , त्यांच्या जन्मदिनी , मानाचा साष्टांग दंडवत प्रणाम !!
टोपणनाव: सानेगुरुजी
जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ११, इ.स. १९५०
के.इ.एम.रुग्णाल य मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: छात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक
प्रमुख स्मारके: वाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: सदाशिव
आई: यशोदाबाई
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनि क, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठीसाहित्यिक होते.




****पोस्ट मुद्दाम १ दिवस आधी टाकत आहे .. उद्या त्यांचा जन्मदिवस

22 December 2011

महान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन

ही गोष्ट आहे इंग्लंडमधली. एक प्रोफ़ेसर त्यांच्या एका टॅक्सीची वाट पहात त्यांच्या विद्यार्थ्यासह उभे होते. टॅक्सी आली आणि त्यांना त्यांच्या ठीकाणी घेऊनही गेली. पण मूळातच गणिताचे प्रोफ़ेसर असल्याने त्यांचे लक्ष टॅक्सीच्या नंबरकडे गेले.
प्रोफ़ेसर त्यांच्या विद्यार्थ्याला म्हणाले," पाहिलंस.... टॅक्सीचा नंबर?"
विद्यार्थी म्हणाला,"हो, पाहिला की, तुम्ही टॅक्सीच्या १७२९ क्रमांकाबद्दल म्हणताय ना?"
"बघितलास कसा शुष्क नंबर आहे तो? अगदीच डल नंबर आहे तो"
त्यांच्या विद्यार्थ्याने चमकून प्रोफ़ेसरांकडे पाहिले आणि म्हणाला," नाही सर, चुकताय तुम्ही, कारण १७२९ ही डल नंबर नाही, उलट ही फ़ार विलक्षण संख्या आहे."
"ती कशी काय?? मला तर ही अगदीच शुष्क वाटते?"प्रतिप्रश्न आला.
"सर, १७२९ ही अशी संख्या आहे की,
१७२९=(१२*१२*१२) + (१*१*१)
१७२९=(१०*१०*१०*) + (९*९*९)"

आता त्याच्याकडे चमकून बघण्याची पाळी प्रोफ़ेसरांची होती. तरिही त्यांचा विद्यार्थी बोलतच होता.
"इतकेच नाही सर, या अशा काही संख्या अहेत की त्यांना त्यांच्या घनांच्या बेरजेच्या स्वरूपात मांडता येतात. अशीच एक संख्या आहे ती म्हणजे ९१=[ (-५)*(-५)*(-५) + ६*६*६]
तर ९१ ची उलटी संख्या आहे १९ आणि आश्चर्य पहा सर, १९ आणि ९१ यांचा गुणाकार हा तुम्ही ज्याला "शुष्क संख्या म्हणता त्या १७२९ इतका येतो. म्हणजेच १७२९ = ९१*१९."
.
.
.
यातील ते प्रोफ़ेसर होते ते प्रोफ़ेसर हार्डी आणि त्यांचा विद्यार्थी होता तो म्हणजे आजच्या तारखेस म्हणजे २२ डिसेंबर १८८७ रोजी जन्मलेला महान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन.

21 December 2011

तेथे पाहिजे जातीचे, ये-या गबाळ्याचे काम नोहे

प्रभु श्री रामांचे पुत्र लव हे लाहोर म्हणे जुन्या 'लवपुरी' चे राजे ...
नंतर तेच रशिया वर राज्य करण्यास गेले आणि हेच ते रशियातील 'स्लाव' वंशाचे जनक ...ज्याला संस्कृत मधे लवण वंशी देखिल संबोधले जाते ...
चीन मधील कुशाहा वंश हा कुश ह्यांचा अनुयायांचा ...
रशियन भाषा ही संस्कृत शब्दांनी भरलेली आहे ...
आणि आता हाच देश श्रीमद भगवतगीते वर बंदी घालतो आहे ह्याहून हास्यास्पद काय ?..
कारण ह्यांनी आता 'वोडका' ची संस्कृति धरली आहे ते आत्मा-परमात्मा योग काय जाणणार ...
असो इसा-मसि काय , पैगम्बर मुहम्मद काय आणि भगवान बुद्ध काय सर्व तत्त्व नक्की काय आहे साईंनाथान्नी स्पष्ट केले ...
सर्व एकच आहे पण सर्वांचे अनुयायी भरकटले आहे ते आतील इष्ट मार्ग सोडून वस्त्र,वेष,ठिकाण आणि रूढी हयात अडकले आहेत ... गीतेचे वैश्विक तत्वे कागदावरील बंदी ने थोड़ी संपणार आहे ... आत्मा एकच आहे त्याला कसला भेद ... भेद तर बुद्धीचा ...

"तेथे पाहिजे जातीचे, ये-या गबाळ्याचे काम नोहे" - तुकोबाराया

19 December 2011

हे आमचे भारतीय रक्त आहे ...

*** ५००० किमी क्षमतेचे अग्नि ५ क्षेपणास्त्र फेब्रुवारी मधे तयार होणार ***
मान्य आहे आमच्या राजकारणी लोकांमधे चिनी नेत्यांसारखी देश निष्ठां नाही ... ना त्यांना देशाला जगाची महासत्ता बनवायची आहे ... आम्ही पैसे,सैन्य आणि व्यापार हयात चीनहुन खुप मागे आहोत ही पण वास्तु स्थिति आहे पण सियाचिन वर १९६१ च्या लढ्यात ३ भारतीय सैनिकानी ३५० चीनी रोकले होते ... हे आमचे भारतीय रक्त आहे ... आम्ही संख्येवर नाही, तंत्रज्ञानावर नाही तर आमच्या देश भक्तिच्या उर्जेवर लढतो हा आमचा इतिहास आहे ...आता चीनी ड्रॅगन डोक्यावर नाचतो आहे .. पाकिस्तान समवेत राजस्थान आणि पंजाब सीमेवर पण उभा आहे पण आता भारत झुकणार नाही कारण ह्या देशासाठी जीवन रचणारे अनेक वीर अजुन ही माती निर्माण करत आहे ... हातात जरी आधुनिक शस्त्र नसली तरी भारतीय सैन्याचे जिगर हे जगमान्य आहे ... आनंदाची गोष्ट म्हणजे ५००० किमी क्षमतेचे अग्नि ५ क्षेपणास्त्र फेब्रुवारी मधे तयार होणार आहे... चीन मधील राजकीय पक्ष चिंताग्रस्त आहेत... डॉ. होमी भाभा जी , विक्रम साराभाई जी, माझी राष्ट्रपति अब्दुल कलाम जी ह्यांनी जो पाया रचला आज त्याचाच परिणाम आहे कि चीन सारख्या बलाढ्य देशाला आपण टक्कर देऊ शकतो आहे ... इसरो (Indian Space Research Organisation) चे अभिनन्दन करावे तेवढे कमी आहे .. जो देश अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला पुरून उरतो आहे त्याला भारतासारखा आर्थिक साधन सम्पत्तिने कमी आणि भ्रष्टाचाराने पोखरलेला देश आज जो मुकाबला करतो आहे ते सैन्य आणि वैज्ञानिक ह्यांच्या क्षमतेवरच ... आज चीनी बनावटीच्या गोष्टी किती आणि कुठल्या वापराव्या ही विचार करायची वेळ आली आहे ...

शशिकांत होतकर' (मुंबई श्री २०११ )

एकीकडे क्रिकेट खेळाडू खोऱ्याने पैसा ओढत असताना एक महाराष्ट्राचा शरीर सौष्ठव पटू 'शशिकांत होतकर' (मुंबई श्री २०११ ) पापड लाटून आपला उदरनिर्वाह करतोय........ पण खर तर ह्या गोष्टीला पाहून शिकावे कि जे आपल्या नशिबात आहे त्या वरून आपण आपले आयुष्य कसे पुढे न्यायचे ... सरकार, व्यवस्था ह्यान्ना दोष देण्यात उर्जा वाया घालवण्यापेक्षा आपले ध्येय गाठने हे लक्ष ठेवणारे नक्कीच थोर
 

आत्मयज्ञ दिन दिनांक १९ डिसेंबर १९२७

आत्मयज्ञ दिन
दिनांक १९ डिसेंबर १९२७

१) हुतात्मा रामप्रसाद बिस्मील (गोरखपूर जेल)
२) हुतात्मा ठाकूर रोशनसिंग (अलाहाबाद जेल)
३) हुतात्मा अशफाकुल्ला खान (फैजाबाद जेल)

काकोरी कटातील हे सर्व क्रांतिकारक ! दि. ९ ऑगस्ट १९२५ लखनौ जवळच्या काकोरी रेलवे स्थानकाजवळ क्रांतिकारकांनी ८ डाऊन या रेल्वेतील सरकारी खजीना लुटला. चंद्रशेखर आजादही त्यात होते. याची शिक्षा म्हणून वरील क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली गेली. रामप्रसाद बिस्मील कवी होते. ते या प्रसंगी म्हणाले,

" मरते बिस्मील, रोशन, लहरी, अशफाक अत्याचारसे !
होंगे पैदा सैकडो इनके रुधिर की धार सें !!"