Subscribe:

Ads 468x60px

21 January 2012

"मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे"

‎ "मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे"

मी विदर्भातील एक भारतीय शेतकरी ...जय जवान जय किसान मधला किसान ..
माझे नाव घेउन लोकांनी या देशावर राज्य केले ...
माझे फोटो काढून छायाचित्रकारान्नी पारितोषिके पटकवली ...
माझ्यासाठी असलेल्या पैश्यावर सरकारी बाबुंचे बंगले झाले ...
मला काही 'चेक' दिले गेले पण ते पण वटले नाही ...
आधुनिक महाराष्ट्रात मी मागील दशकात ५०,००० हुन अधिक वेळा आत्महत्या केली आहे ..
माझ्या परदेशी पाठवलेल्या मालाला जेव्हा नाकारले गेले आणि त्याची भरपाई आली ती कधीच माझ्या पर्यंत पोहोचू नाही दिली ...
आमच्या घरी ह्या देशाचे कर्ते धरते पण अनेकदा भेट देऊन गेले ...
कदाचित आमच्या अर्धवट जळनार्या चितेला जोरात फुंकर मारायला आले असतील ...
ना आम्हाला शिक्षण प्राप्त आहे ना आमची राजकारणात मतसंख्या,पत आणि जात मायने राखते ...
शेवट आम्ही वाघाने पोटभर खावुन सोडलेल्या शिकारी सारखेच ... अर्धमेले पडलो आहोत ...
कधी विरोधकांचे गिधाड येवून राजकारणाचे लचके तोडतो तर कधी सरकारी अधिकार्यांचा लांडगा ...
मधे एक साधू पण पाठवला होता आम्हाला सर्वपरित्याग शिकवायला ...
कदाचित आमची हाड विकून पैसे कमवायचा इरादा होता ...
असे म्हणता कि हत्ती जेव्हा प्रवास करता तर एखाद्या ठिकाणी आपला नातलग मृत पावला असेल तर काही क्षण शांत उभे राहता ...
पण आमचे नाव घेउन मोठे झालेले लोक आता आम्हाला आठवायला पण घाबरता ...
बरोबर आहे आमच्या कड़े ना कोणी मोठा बिल्डर आहे नाही माफिया राज जे आम्ही कोणाला नैवेद्य दाखवू शकू ...
खरे तर चकाचक असलेले शहरी भावविश्व म्हणजेच हां देश नव्हे ही जाणीव आता उरली नाही ..
तरी म्हंटले संधि साधून तुमच्याशी बोलून घ्यावे कारण मी पण एखादी दोरी आणि उंच झाड़ शोधतो आहे ...
कधी परत बोलण्यास उरेल ... नाही उरणार ...

No comments:

Post a Comment