जर हातात बंदुकी घेउन पोलिसांना वाटत असेल की ती कोणावर पण चालवावी तर ते चुकीचे आहे ...ह्या वरून एक नक्की समजुन येइल की देशा मधे जागो जागी नक्षलवादी का बर तयार होवून राहिले आहे ...मावळ मधील गोळीबार हे फक्त आन्दोलन दाबन्याचे प्रतिक नसून तेथील जनतेला राजकीय धडा शिकवण्याचे षड़यंत्र तर नाही ना असे प्रथम दर्शनी वाटते ...
असे म्हंटले जाते की शेतकरी जर सुखी असेल तर राष्ट्र पण सुखी असते नाहीतर त्या राष्ट्राचे सुख हे उब ना देणारे पांघरून असते ... आपल्या देशात नेमके हेच घडत आहे ह्याचे मला दुःख आहे .. काही मुठभर महत्वाकांक्षी लोक हे आपल्या स्वप्न पूर्ति साठी शेतकरी, कामगार आणि सामान्य जनता ह्यांच्या भावनेचे भांडवल करून आपला उत्कर्ष साधता आणि ही जनता मात्र सर्पण बनुन पीढ़ी दर पीढ़ी जळत राहते ... फ्रेंडशिप डे अणि तत्सम दिवशी भरभरून निघणार्य भावना अशा वेळी ह्रास का पावता ..हा मला नेहमी प्रश्न पडतो ..आणि हा प्रश्न मी स्वतः लाच विचारतो की मी असा का झालो आहे ..
शेतकरी काय पहिल्यांदी नाही मेला [मारला?] , ना ही शेवटची वेळ असेल पण पाणी प्रश्नासाठी भांडणारे शेतकरी काय एवढे विघातक होते की त्यांवर अश्या गोळ्या चालाव्या ? जर जवाबदार व्यवस्थेस अश्या समस्या सोडवता येत नसतील तर मग का बर्र जपतो आहे आम्हीच लोकशाही गोंजारत ? लोकशाही नावाची प्रभावी तलवार आता मद्य प्यालेल्या माकडाच्या हाती आहे एवढे नक्की ... आणि सामान्य माणुस आपल्या पोटात या हाल अपेष्ठा आणि वेदनांचा हां बारूद आपल्या पोटात घेउन जगत आहे ... हो हो बारुदच ... जो कधी फुटला तर समोर येइल ते संपून जाईल पण असे घड़ने आता दुरापास्त झाले आहे कारण आता सगळे वाटले गेले आहे ..सगल्यानी आपल्या माथ्यावर जात धर्म प्रान्त पक्ष हे लेबल लावले आहे ...
असो मी काही भड़काऊ अग्रलेख लिहित नाही ...मी तर सौम्य भाषेत माझ्या प्रतिक्रिया लिहण्याचा एक प्रामणिक प्रयत्न केला आहे शेवट काय एकच प्रश्न गुंतवून ठेवतो की 'जय जवान, जय किसान' नारा देणारा हाच देश होता का ?' मृत्युमुखी पडलेल्या हक्क जग्रुकान्ना माझी मनापासून आदरांजलि