Subscribe:

Ads 468x60px

19 January 2012

असा महाराणा प्रताप

१९ जानेवारी १५९७ रोजी महापराक्रमी असा महाराणा प्रताप यांचे राजधानी चावंड येथे मृत्यु.अकबराच्या काळात प्रत्येक हिन्दुच्या घोड्याच्या पाठीवर मुघलांच्या गुलामगिरिचे द्योतक म्हणुन तप्त लोहमुद्रा उठवली जात असे.बिन डागललेला घोड़ा आणि ताठ मानने वावरणारा हिन्दू फ़क्त राणा प्रतापच्याच राज्यात दिसत होता.सतत १४ वर्षे अकबराची सेना मेवाडमध्ये झगडत होती,मार खात होती आणि तिचे सेनापती आळीपाळीने बादशाहाकडे आपले काले ठिक्कर मुख मंडल दाखवण्यास जात होते.जून १५७६ च्या हलदी घाटीच्या
लढाईनंतर मुघलांच्या सेनापतिंमध्ये राजा जगन्नाथ कछवाह याने १५८६ मध्ये शेवटचे मेवाडवर आक्रमण केल्यानंतर राणा प्रतापने त्याचाही समाचार घेत विजेच्या वेगाने आपली जागा बदलली.शेवटी वैतागुन राजा जगन्नाथ कछवाह फ़तेहपुर सिक्रिला अकबराकडे अपयश घेवून परतला.या शेवटच्या अपयशानंतर अकबराने 'राणा प्रतापला नमवने ही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही' हे ओळखले आणि म्हनुनच शेवटची १४ वर्षे त्याने राणा प्रताप वर आक्रमणच केले नाही.१५९७ पर्यंत महाराणा प्रतापसिंहाच्या निर्णयापर्यंत अकबराची मेवाडकड़े वाकडी नजर करण्याची इच्छाच झाली नाही,ही एकच गोष्ट प्रतापचे "पराभूत" म्हणुन इतिहासात केले गेलेले वर्णन किती चुकीचे आहे हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.


माहिती स्त्रोत : इन्टरनेट

No comments:

Post a Comment