skip to main |
skip to sidebar
इतिहास नेहमीच रंगवून आणि मोठा करून सांगितला जातो असे म्हणता पण
शिवरायांचे आत्ताचे किल्ले आणि गड पाहिले तर ते अंगावर अशी रोमहर्षता
निर्माण करता आणि मनात एक प्रश्न चिन्ह निर्माण करता कि कसे काय हे असे
जलदुर्ग आणि विशाल दुर्ग त्या समयी बांधले असतील ... काय तो काळ असेल
जेव्हा असा थोर राजा आणि त्याचा प्रत्येक शब्द प्राण देऊन पेलणारे ते
स्वराज्य सेवक घडले ... शिवरायांच्या कार्या पुढे इतिहासाचे शब्द पण
त्यांची कमी महती सांगत असतील अशी खात्रिदायक शंका येते ... आपल्या शारीरिक
मर्यादे पलिकडे कार्य घड़वनार्या महापुरुषान्चि भूमि असलेल्या ह्या देशात
शिवराय हे आपले भूषण आहे ... नविन वर्षाची सुरुवात हे त्यांचा आदर्श
ठेवूनच करावी हा संकल्प आहे ... ह्या जगात काही करण्याची आपली जवाबदारी
सर्वाधिक आहे कारण जगाने गौरवलेल्या राजाच्या मातीत आपण पण जन्म घेतला आहे
....