Subscribe:

Ads 468x60px

22 December 2011

महान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन

ही गोष्ट आहे इंग्लंडमधली. एक प्रोफ़ेसर त्यांच्या एका टॅक्सीची वाट पहात त्यांच्या विद्यार्थ्यासह उभे होते. टॅक्सी आली आणि त्यांना त्यांच्या ठीकाणी घेऊनही गेली. पण मूळातच गणिताचे प्रोफ़ेसर असल्याने त्यांचे लक्ष टॅक्सीच्या नंबरकडे गेले.
प्रोफ़ेसर त्यांच्या विद्यार्थ्याला म्हणाले," पाहिलंस.... टॅक्सीचा नंबर?"
विद्यार्थी म्हणाला,"हो, पाहिला की, तुम्ही टॅक्सीच्या १७२९ क्रमांकाबद्दल म्हणताय ना?"
"बघितलास कसा शुष्क नंबर आहे तो? अगदीच डल नंबर आहे तो"
त्यांच्या विद्यार्थ्याने चमकून प्रोफ़ेसरांकडे पाहिले आणि म्हणाला," नाही सर, चुकताय तुम्ही, कारण १७२९ ही डल नंबर नाही, उलट ही फ़ार विलक्षण संख्या आहे."
"ती कशी काय?? मला तर ही अगदीच शुष्क वाटते?"प्रतिप्रश्न आला.
"सर, १७२९ ही अशी संख्या आहे की,
१७२९=(१२*१२*१२) + (१*१*१)
१७२९=(१०*१०*१०*) + (९*९*९)"

आता त्याच्याकडे चमकून बघण्याची पाळी प्रोफ़ेसरांची होती. तरिही त्यांचा विद्यार्थी बोलतच होता.
"इतकेच नाही सर, या अशा काही संख्या अहेत की त्यांना त्यांच्या घनांच्या बेरजेच्या स्वरूपात मांडता येतात. अशीच एक संख्या आहे ती म्हणजे ९१=[ (-५)*(-५)*(-५) + ६*६*६]
तर ९१ ची उलटी संख्या आहे १९ आणि आश्चर्य पहा सर, १९ आणि ९१ यांचा गुणाकार हा तुम्ही ज्याला "शुष्क संख्या म्हणता त्या १७२९ इतका येतो. म्हणजेच १७२९ = ९१*१९."
.
.
.
यातील ते प्रोफ़ेसर होते ते प्रोफ़ेसर हार्डी आणि त्यांचा विद्यार्थी होता तो म्हणजे आजच्या तारखेस म्हणजे २२ डिसेंबर १८८७ रोजी जन्मलेला महान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन.

No comments:

Post a Comment