skip to main |
skip to sidebar
मार्लेश्वर धबधबा...
मार्लेश्वर धबधबा...
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच
तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे
प्रसिद्ध ठिकाण आहे.
गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत
असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. ह्या
स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून
पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून
हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली
आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.
No comments:
Post a Comment