Subscribe:

Ads 468x60px

21 January 2012

क्रांतिकेतू रासबिहारी बोस

क्रांतिकेतू रासबिहारी बोस
जन्म :- २५ मे १८८६, पालाटबिधानी
निधन :- २१ जानेवारी १९४५, टोकियो

२३ डिसेंबर १९१२ ला दिल्लीच्या नवीन राजधानीत हत्तीवरून दिमाखाने प्रवेश करणारे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकण्याचा अभूतपूर्व पराक्रम करणारे महानायक म्हणजे राश बिहारी बोस.

रासबिहारी विनोदबिहारी बोस. हे बंगालच्या भद्र समाजातील सुपूत्र. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथील हेडक्लार्क रासबिहारी सर्व हिंदुस्थानात क्रांतिकार्याचे जाळे विणू लागले. ब्रिटिशांची गुप्त पोलिसी प्रबळ संघटना ही फक्त या एकाच क्रांतिकारकास पकडू शकली नाही. जपानमध्ये असतानाही त्यांच्यावर १९१५ साली पकडवॉरंट जारी करण्यात आले. परंतु जपान सरकारही त्यांना पकडू शकले नाही.

स्वा.वि.दा. सावरकर हे १९३७ साली स्थानबद्धतेतून सुटल्यावर त्यांनी हिंदुमहासभेची धुरा पत्करली. रासबिहारींनी त्याचा पुरस्कार केला.

१९३९ साली दुसरे महयुद्ध पेटले. त्या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूचा मित्रदेश होता. हि संधी मिळताच १९४२ मध्ये बॅंकॉक येथे रास बिहारींनी ठिकठिकाणच्या भारतीय क्रांतिकारकांना एकत्र बोलावले. जपानने युद्धबंदी केलेले भारतीय सेनाधिकारीही या बैठकिस हाजर होते. रासबिहारी स्वतः अध्यक्ष होते. तेथे इंडियन नॅशनल आर्मि स्थापन करण्याचे नक्की ठरले. आझाद हिंद सैन्य - ते हेच.

सुभाषचंद्रांनी स्थापने केलेल्या हिंदुस्थान सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून रासबिहारींची नेमणूक झाली. परंतु ते पद त्यांना फार दिवस लाभले नाही. सिंगापूरची बैठक संपवून जपानला विमानाने परत येत असता त्यांचा आजार वाढला. सन १९४५. त्यांना हॉस्पिटलमध्ये हालवले. आजारीपणात जपानच्या प्रमुखांनी रासबिहारींना "सेकंड ऑर्डर ऑफ मेरिट" म्हणून सन्मानपूर्वक सूर्याचे दुहेरी तेजोवलय असलेले चिन्ह अर्पण केले. २१ जानेवारी १९४५ रोजी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विचार करीत हा जपानातील हिंदुमहासभेचा पदाधिकारी मातृभूमीचे स्मरण करीत कालवश झाला. त्यांच्या चरणी विनम्र प्रणाम !

No comments:

Post a Comment