skip to main |
skip to sidebar
●๋•●๋• कविता - भिकारी ●๋•●๋•
ऐ निघ पुढे.. ऐकून मन टूटते ...
सारे जगच भिकारी पण माझी तुम्हाला लाज वाटते ...
जेव्हा काठी घालतो मला ट्राफिक पोलिस..
तेव्हा जिव फार होते माझा कासाविस...
मी तर मागुन प्रेमाने भिक स्वीकारतो रे ...
पडक्या दातावर हसू आणून आशीर्वाद देतो रे...
पण तो तर घेतो हिसकावून समोरच्याचा हक्क...
पैसे खावुन प्रामाणिक आहे दाखवतो चक्क ...
तो पण बाळगतो की माझ्या सारखीच लाचारी...
तो जनतेचा सेवक ठरतो आणि मी मात्र फक्त भिकारी ...
ट्राफिक पोलिस तर एक उदाहरण आहे ...
लोकशाही हेच भिक मागायचे कारण आहे ...
भरल्या पोटी श्रीमंत पण भिकाच मागता ...
पैसा अडका आणि मुली साठी दुसर्या समोर झुकता ...
माझे काय मी तर फक्त पोटाची खळगी भरतो...
चरितार्थ चालवण्यासाठी मर मर मरतो ...
अभिमान आहे मला माझा मी चोरी नाही करत ...
दुसराच्या जिवावर उठून मी माझे घर नाही भरत...
पण नौकरी मागत फिरतो जो घेउन बेकारी ...
तो ठरतो सुक्षिशित बेरोजगार आणि मी मात्र फक्त भिकारी ...
कसे आहे जग म्हणजे जगण्याची शर्यत...
कोणी गर्दित पुढे तर कोणी अडकतो दर्या खोर्यात ...
शेवट काय सोनाच्या ताटात पण दोन घास जिवाला...
शेतात मातीत खावुन पण असते जगण्याची कला ...
मी पण तर तेच करतो तुमच्या पुढे हाथ पसरून...
पण मी एक कटकट आहे पुढे जाता नाक मुरडून...
माझा एवढा कंटाळा पण नेता मात्र चालतो...
चरित्र्याहीन पडद्यावरचा नायक मात्र भावतो...
त्यांच्यावर करता तुम्ही प्रेमाची उधळण भारी...
ते ठरता समाजाचे प्रतिक आणि मी मात्र फक्त आणि फक्त भिकारी ...
सर्व हक्क - असाच एकजण :)
ज्यांनी वेळ काढून वाचली त्यांचे आभार
No comments:
Post a Comment