Subscribe:

Ads 468x60px

26 January 2012

हा तोच झेंडा आहे

हा तोच झेंडा आहे जो प्राप्त करण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण दिले .. अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले ..
आपले घर,संसार,आप्तस्वकीय सर्वांना डावलुन फक्त हा देश घडवण्यासाठी आणि हां तिरंगा अस्तित्वात आणण्यासाठी जीवन प्रवास रचला ...
आपले सैन्य आणि सुरक्षा दल आपले प्राण ह्या मातीसाठी देऊन आणि ह्या हरित भूमीला देश भक्तीचा लाल असा रक्त रंग देऊन ह्या तिरंग्याचा मान राखता ...


ह्या देशात कोणी पण ह्या राष्ट्रचिन्हाहुन अथवा गणराज्याहून मोठा नाही ..
अथवा मानत असेल तर ते मान्य नाही .. जाती,धर्माच्या स्वार्थी दोर्या अंगाला चिटकवुन अनेक बाहुले रोज आपला खेळ दाखवत असता ...
तो खेळ पाहून अनेक जन हर्षित होता, अनेक जन आकर्षित होता पण व्यक्ति आणि समाजाहुन मोठे प्रतिक आहे ते म्हणजे भारत भूमिचा हा तिरंगा आणि तिचे हे गण राज्य ...
आपल्या देशात जाज्वल्य देशाभिमान आहे पण दुर्दैव्य हे आहे कि मुठभर स्वार्थी लोक ह्या देशाला खड्ड्यात घालत आहे आणि आपण त्यांच्याशी स्वार्थाची नाळ जोडून अनुमोदन देतो ...
तरी ह्या प्रजासत्ताक दिनी आपली जात,धर्मं आणि भाषा ह्यावर विचार करून देशा साठी भ्रष्टाचारी आणि अनैतिक लोकांचा विरोध करू ...
विरोधाची शक्ति ही सर्वात मोठी आहे .. नाही तर काही दशकांनंतर पुढची पीढ़ी हां दिवस साजरा करायला देखिल पुढे नाही येणार ...
जय हिंद !! वन्दे मातरम !!!

No comments:

Post a Comment