नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म :- २३ जानेवारी १८९७, कटक
अदृष्य :- १८ ऑगस्ट १९४५, फोर्मोसा
२३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस या महान क्रांतोसूर्याचा
उदय झाला. जानकीनाथ व प्रभादेवी यांचे सुभाषचंद्र हे दैदिप्यमान अपत्य.
लहानपणापासूनच प्रगल्भ असलेले सुभाषबाबू उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
तेथे आय. सी. एस. ची परीक्षा उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी
मिळाली. पण त्या नोकरीमुळे त्यांना अस्वस्थता भासू लागली. त्यांनी नोकरीचा
राजीनामा दिला. स्वातंत्र्याची तळमळ त्यांना लागलेली, त्यांनी गांधींची भेट
घेतली. परंतू त्यांच्या धोरणामूळे सुभाषबाबूंचे समाधान झाले नाही. मग ते
देशबंधु चित्तरंजन दास यांचे शिष्य झाले.