skip to main |
skip to sidebar
नविन वर्ष येते आहे ..
नविन
वर्ष येते आहे .. आणि आता आज मनात मंथन सुरु झाले आहे ... वर्षाचा शेवटचा
दिवस हां नेहमी असाच असतो ... भूतकाळाच्या लाटा सर्व प्रसंग घेउन आत आपटत
आहेत ... काहीतरी त्रेधा तिरपीट चालू असते मनामधे ... त्यातून मागील
वर्षातील ग्लानिर्भाव आणि सुखाचे क्षण यांना डोक्यात कुठेतरी बाजूला
डाम्बुन त्यातून नविन आयुष्य रेघ कशी आखावी हेच काहीतरी धोरण धरले आहे ...
त्यात २०१२ हे धर्म,ज्योतिष्य आणि विज्ञानं ह्या त्रिकुटाने
वेध साधलेले वर्ष म्हणजे काळजामधे थोडा जास्तच अंतर्नाद होत आहे ... मागील
वर्षाने सर्व भावनिक अनुभव दिले आणि त्यानुसार नविन वर्ष हे जरा जास्तच
कुतूहल निर्माण करत आहे ... यावर्षी मनावर आणि कर्मावर जमलेली विचारांची
काजविच २०१२ ची कथा लिहिवो हां ध्यास घेउन नविन वर्षाचे स्वागत करायचा
निर्धार राखला आहे ...तुम्ही पण अल्पायुषी पेज मधून मैत्री साधली त्याचा
विशेष आनंद आहेच ... २०१२ मी तयार आहे ...
No comments:
Post a Comment