गेल्या काही दिवसां पासून फेसबुक वर पाहतो आहे कि ,
"मराठी आहे मराठीच राहणार, नविन
वर्षाच्या शुभेच्छा गुडीपाडव्यालाच देणार.
॥जय हिंद॥जय महाराष्ट्॥"
पाहून आनंद वाटला कि चला मराठी माणुस खर्या अर्थाने जागा झाला पण मग हे प्रश्न पण मनात आले , तसा मला कोणाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही पण
१. अश्या घोषणा देणारे लोक त्यांच्या नेत्यांचे,स्वतः चे वाढ़दिवस का बर शालिवाहन दर्शिकेनुसार साजरे नाही करत ?
२. आपले 'बाल गन्धर्व' आणि 'हरीशचंद्राची फैक्ट्री' सारखे उत्कृष्ट चित्रपटान्ना महाराष्ट्राच्या मातीत पण प्रेक्षक का नाही भेटत ?
३. किती जण आपला वाढदिवस तिथि नुसार साजरा करता अथवा त्यांना माहिती आहे ... माझा वाढदिवस माझ्या घरचे तिथिनेच साजरा करता म्हणून ती किती मोठी कसरत आहे हे मला ठावुक आहे . चला किती जन्नाना हे कुठले शालिवाहन शके चालू आहे ह्याची कल्पना आहे ? खर सांगतो मी पण काही दिवसापूर्वी विसरलो होतो म्हणून 'कालनिर्णय' पाहिले होते .
४. महाभारत मधे १० पांडव पुत्र, कौरवांचे सावत्र भाऊ, कर्णाचा लहान भाऊ आणि इतर शेकडो पात्र निदान पांडवांचे नाव पण किती नव युवकांना विशेषता: युवातिन्ना माहित आहे ?
५. आम्ही मराठी लोक आता आपल्या पाल्याला का इंग्लिश माध्यमा मधेच टाकतो .
६. 'मनातील अभंग' फेसबुक पेज चा मी कार्यवाहक आहे आणि मला चांगली कल्पना आहे कि किती लोकांना संत साहित्य आणि त्यातील मराठी समजते , का असे होत आहे ?
७. इंग्लिश ही मराठी हुन जुनी भाषा आहे पण १६ व्या शतकातील हिंदी समोर १ ल्या शतकातील मराठी का मागे पडत आहे ?
८ . संत तुकाराम जर शेकडो अभंग हिंदी मधे लिहू शकता, संत नामदेव गुरु ग्रन्थ साहेब मधे योगदान देऊ शकता आणि संत कबीर जर विठुराया वर अभंग रचु शकता तर मराठीला संकोचित करणारे तुम्ही आम्ही कोण ?
कोणाला कोणी काय करावे हे सांगण्याची माझी पत नाही कारण मी फार सामान्य व्यक्ति आहे पण मराठी चा उदोउदो करून ती आत रुजणार आहे का ? भावनिक फोटो पाहून त्याला LIKE करणे सोपे असते पण मराठी प्रेम आत रुजवने हे तेवढे सोपे नाही . 'नहापास' नावाचा एक ग्रीक राजा महाराष्ट्रावर २००० वर्षा पूर्वी राज्य करायचा त्यानेच नाशिक मधे पांडव लेणी आणि पुण्याजवळ कार्ल्याच्या लेणी बांधल्या आहे. त्याने आपला सम्पूर्ण महाराष्ट्र त्यासमयी उभा केला तो स्वतः येथील भाषा शिकला आणि हिन्दू स्त्रीशी विवाह केला. त्याने आपली वस्त्रे यूरोप मधे नेवून विकली आणि त्यावेळी आपले राज्य हे जगाचे कापड केंद्र होते. तिथून महान शिवरायांपर्यंत चा इतिहास आणि सयुंक्त महाराष्ट्र आंदोलनातिल सर्व हुतात्मे हे सर्व मला ठावुक आहे का ?
प्रश्न व्यक्तिगत ज्ञानाचा नाही, ना भावनेचा आहे पण आपल्यावर अनेक गोष्टी आता लादल्या गेल्या आहे आणि हे सत्य आहे ... मराठी प्रेम नक्की काय हे मला तसे समजत नाही आणि माझा मराठी आणि हिन्दू बाणा एवढा लाचार देखिल नाही जो ईसाई,मुस्लिम किंवा इतर धर्मीय लोकांना त्यांच्या नववर्षाला शुभेच्छा देऊन कमी होईल. मी हिन्दू आहेच! प्रश्नच नाही पण त्याची जाहिरात करावी असे वाटत नाही कारण गीता आणि ज्ञानेश्वरी हे वाचून आत ठेवावे अथवा जन उद्धारार्थ वापरावे ही आपली संस्कृति . जर फक्त गुडीपाडव्याला शुभेच्छा देणेच हे मराठी असण्याचे प्रमाण आहे तर मग मलाच मराठी असणे म्हणजे काय हे समजल नाही ..आणि तो समजण्याचा मी नक्की प्रयत्न करील ...
एक नवशिकावु म्हणून मला माफ़ी दयाल ही अपेक्षा आहे ..अपेक्षा काय ही तर मराठी संस्कृतीच आहे ...
-असाच एकजण

No comments:
Post a Comment